उत्पन्न कितीही असो , लागणार नाही टॅक्स

प्रत्येक व्यक्ती भविष्याचा विचार करून कुठे न कुठे गुंतवणूक करीत असतो ,जर तुम्ही कुठे गुंतवणूक करत असाल , तर तुम्ही फक्त योजना किंवा फंडची मागील कामगिरी अन् परताव्याची क्षमता याचा अभ्यास न करता करासारख्या इतर बाबींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे . तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास सरकारकडून कर आकारला जातो हे तुम्हाला माहीत असेलच ; पण तुमच्यासाठी काही गुंतवणुकीचे पर्याय देखील उपलब्ध आहेत जिथे गुंतवणुक केल्यास तुम्हाला कर भरावा लागणार नाही , तसेच मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम देखील पूर्णपणे करमुक्त असते . गुंतवणुकीचे कोणते पर्याय अधिक चांगले ते आजच्या लेखात जाणून घेऊ .income tax return filing

 

पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना ( पीपीएफ )

ही गुंतवणूक १५ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह येते . दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना करणाऱ्यांसाठी हा एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे . पीपीएफमध्ये गुंतवलेले पैसे , त्यावर मिळणारे व्याज , मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम , तिन्ही करमुक्त आहेत . ppf investment comes under which section त्यामुळे तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही .या गुंतवणुकीवर पीपीएफमध्ये वार्षिक व्याज दर ७.१ टक्के देण्यात येते . त्यामुळे गुंतवणूकदार व्यक्तीला अधिक प्रमाणात लाभ प्राप्त होतो.

हे देखील वाचा »  श्रम योगी मानधन योजना I श्रमिकांना मिळणार 3000 रु महिना

सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना 

sukanya samriddhi yojana in marathi जर तुमच्या घरात मुलगी असेल तर तुम्ही भारत सरकारच्या सुकन्या समृद्धी योजना यामध्ये गुंतवणूक करू शकतात.या योजनेमध्ये मुलींच्या नावाचे अकाऊंट उघडून त्यावर तुम्ही गुंतवणूक करू शकतात.पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सरकार दरवर्षी ७.६० टक्के व्याज देते . या योजनेमध्ये , आयकर कलम ८० C अंतर्गत कर सवलत आहे . त्याच वेळी , खात्यात जमा केलेली रक्कम , मिळालेले व्याज आणि परिपक्वता रक्कम करमुक्त आहे . यामध्ये तुम्ही आयकर सवलतीसाठी जास्तीत जास्त वार्षिक १.५० लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता .यावरील रक्कम तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी काढू शकतात.


एनपीएस (NPS Scheme)

national pension scheme details एनपीएस(NPS Scheme) ही निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन केलेली गुंतवणूक योजना आहे . या योजनेत पॉलिसी परिपक्चतेनंतर ६० टक्के निधी उपलब्ध होतो . याद्वारे मिळणारी रक्कम ही पूर्णतः करमुक्त आहे . उर्वरित रक्कम विमा कंपनीकडे सोपवली जाते जिथून गुंतवणूकदारांना आयुष्यभर पेन्शनच्या स्वरुपात ही रक्कम मिळत राहते ; पण ही पेन्शन कराच्या कक्षेत येते . 

हे देखील वाचा »  कुक्कटपालन साठी मिळणार अनुदान I पात्रशेतकर्‍यांना मिळणार लाभ

ईपीएफ e ppf

e-PF मध्ये  जमा केलेली रक्कम तुम्ही पीएफ (PF Account) खात्यात जमा केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम ८० C अंतर्गत आयकरातून सूट मिळते . तुमच्या ईपीएफ खात्यात नियोक्त्याने जमा केलेल्या रकमेवरही कर सूट उपलब्ध आहे . यामध्ये अट अशी आहे की , ही रक्कम तुमच्या मूळ वेतनाच्या १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी . यापेक्षा जास्त रक्कम असल्यास कर भरावा लागतो  .e ppf


जीवन विमा पॉलिसी 

जर तुम्ही भविष्याचा विचार करून जीवन विमा पॉलिसी घेतली  असेल , तर कलम १० ( १० d ) अंतर्गत क्लेम करताना किंवा त्याच्या मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे ; परंतु यामध्ये अट अशी आहे की तुमच्या जीवन विमा पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम तिच्या विमा रकमेच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा . jeevan bima policy in marathi  पॉलिसीमध्ये प्रीमियम यापेक्षा जास्त असल्यास , तुम्हाला अतिरिक्त रकमेवर आयकर भरावा लागेल . जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही अपंग किंवा गंभीर आजारी व्यक्तीसाठी जीवन विमा पॉलिसी घेतली असेल , तर प्रीमियमची रक्कम विमा रकमेच्या १५ टक्केपर्यंत असू शकते . 


Previous Post Next Post